सिंहगडाची सायकलस्वारी
कलंदर प्रफुल्ल डांगे यांना फाट्यावर मारून सिंहगड सायकल सफर केल्याबद्दल माफी मागून लेखारंभ करतो. डांगे,आपली सिंहगड सफर लवकरच होईल...थोडा धीर धरा. तर सुरूवात अशी झाली.... प्रफुल्ल डांगे गेल्या कितीक दिवसांपासून हट्ट धरून बसले होते. सिंहगडावर सायकलीने जायचं म्हणून. योग येतच नव्हता. गेले साताठ रविवार काही ना काही निमित्ताने कामातच गेले. सिंहगडाला थोडं होल्डवर ठेवले. या आठवड्यात मंगळवारी की बुधवारी कधीतरी सरकाराची मर्जी पाहून माझ्या सिंहगड सायकल सफारीचा प्रस्ताव मांडला. सरकारपक्षाला प्रस्ताव मान्य झाला. गुरुवारी बरेच दिवस पावसामुळे यार्डात पडलेली सायकल बाहेर काढली. भंडारा डोंगरावर जाऊन आलो. शनिवारी सकाळी डांगेंना फोन केला. सिंहगड सायकल सफरी बद्दल सांगितले. पण त्यांचा सज्जनगडावर जाण्याचा प्लॅन आधीपासूनच ठरलेला होता. एकतर गुरुवारी भंडारा डोंगरावर त्यांना न सांगता गेल्यामुळे त्यांनी आधीच कुरकुर केली होती. त्यात परत सिंहगडचा प्लॅन ते नसतानाच ठरवल्यामुळे त्यांनी लगेच निषेध नोंदवला. संध्याकाळी सायकलची बारीक-सारीक मरम्मत केली. संध्याकाळची ओपीडी झाली. रात्री घरी येऊन झोपायला बारा वाजले. सध्...